क्रॉस स्टाफ

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

विश्व कसे आहे?  हे कोडे आणि  इथून तिथे कसे जायचे? ही समस्या सोडवण्यासाठी माणूस सतत संघर्ष करत राहिला.  एकमेकांशी संबंधित असलेली दोन्ही कोडी सोडवणं शक्य झालं एका साध्या   क्रॉस स्टाफ नावाच्या वापरण्यास सुलभ अशा यांत्रिक उपकरणामुळे.

अनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून माणूस विश्वाचं स्वरूप धुंडाळण्यासाठी झगडत आहे. विद्वानांनी ग्रहांच्या हालचालीमागचे तर्कशास्त्र शोधण्याचे प्रयत्न केले. याच शोधाचा पाठलाग करता करता ताऱ्यांची गणना सुरु झाली. ताऱ्यांच्या आकारांना नावे दिली गेली. गोलाकार त्रिकोणमिती या गणिताच्या नवीन शाखेचा शोध लागला. मोठ्या प्रमाणात गणना चालू झाल्या. साइन, कोसाइन यांचे तक्ते मुखोद्गत केले जाऊ लागले. नोंदींचा उलगडा होण्यासाठी अनेक शतके त्यांचे जतन केले गेले. या सर्व प्रयत्नांतून विज्ञानाच्या नवीन पर्वास सुरुवात झाली. यातूनच विश्वातील अनेक कोडी सोडवली जात होती.

बुद्धिमान प्रवाशांच्या प्रयत्नांची इथे दाखल घेणं आवश्यक आहे. त्यांच्या नोंदींतून पृथ्वी गोल आहे या बाबीस वस्तुस्थिती मानले जाऊ लागले. पृथ्वीच्या चंद्रापासून असलेल्या अंतराचा साधारण अंदाज बांधला जाऊ लागला. अत्यंत महत्वाचे असे हे दोन शोध लागून २००० वर्षे उलटली. खगोलशास्त्राचा माणसाने केलेला उपयोग ही एक अभूतपूर्व घटना आहे. समुद्रातील दुर्गम बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी आदिवासींनी खगोलशास्त्रीय प्रवासदर्शनाचा वापर केला असे मानले जाते. वास्को द गामा जेव्हा पोर्तुगालवरून भारतात आला तेव्हा त्याने ॲस्ट्रोलेब अशा नावाचे प्रवासदर्शनाचे उपकरण वापरले. हे उपकरण म्हणजे असा पहिला यांत्रिक संगणक होता ज्याने आकडेमोड कमी केली. मध्ययुगात ॲस्ट्रोलेब खूप लोकप्रिय झाला होता. वास्को द गामा जेव्हा भारतात आला तेव्हा त्यास ॲस्ट्रोलेबची भारतीय आवृत्तीसुद्धा आढळली होती.

दूरदर्शक दुर्बीण आणि इतर अचूकतेचा वेध घेणाऱ्या उपकरणांच्या शोधानंतर माणसाने या क्षेत्रात मोलाची प्रगती केली. खोल समुद्रातून सुरक्षित जागेस पोहचण्यासाठी यापूर्वी माणूस सर्वसामान्य उपकरणांचा वापर करीत असे. या उपकरणांचा वापर करून तसेच पंचांग आणि गणिताच्या तक्त्यांच्या साहाय्याने जगाच्या नकाशावर, खलाशी, जहाजांची स्थिती निश्चित करीत असंत.

अर्वाचीन काळात गोल, भग्ना, चक्र, घटी, शंकू, शाक्त, कारतार्य:, पिप्त, कपाळ, शलाका अशासारखी काही उपकरणे भारतीय वापरत होते. जरी ही उपकरणे वरून साधी वाटत असली तरी बहुधा याच काळात त्याची अचूक संरचना ही त्याची विशेषता होती. 

क्रॉस स्टाफ नावाच्या कोन मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या अशाच हाताळण्यास सुलभ अशा उपकरणाने माझे लक्ष वेधून घेतले. हे चित्र माणसाच्या या संघर्षाला दिलेली मानवंदना आहे. क्रॉस स्टाफ आणि एकचक्षू समुद्री चाचे यांची मी चित्रासाठी निवड केली आहे.  काही सिद्धांतआणि दंतकथा यांच्यात अंतर्भूत असलेल्या  नव्या युगारंभ  या चित्रातून रेखाटलेला आहे. 

चाचा म्हणजे एकचक्षू असलेला, असे रेखाटन आपल्या मनात झाले अाहे.  सूर्याचा कोन मापण्यासाठी,  तज्ञ खलाशास एक डोळा झाकावा लागणे साहजिक आहे. त्यासाठी डोळ्यावरच्या पट्टीचा वापर साहजिक पणे करावा लागतो. त्यातून कदाचित हे प्रतीकात्मक रेखाटन निर्माण झाले असावे. माझ्यासाठी जहाजास सुरक्षित आश्रयस्थानी पोहोचवणाऱ्या जाणकाराचा तो एक प्रतिनिधी आहे.  

One thought on “क्रॉस स्टाफ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *