विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
मेरू, सुमेरू आणि महामेरू विश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. सर्व खगोलीय ग्रहतारे या पर्वताभोवती परिभ्रमण करीत असतात.
साधारणतः ग्रीक काळादरम्यान आणि त्यानंतर विश्वाच्या स्वरूपाचा एक सिद्धांत प्रचलित होऊ लागला होता. अनेक संस्कृतींमध्ये हा सिद्धांत मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला होता. एका पृथ्वीच्या आसाभोवती फिरणारा विश्वगोल आणि ज्यावर ग्रह फिरू शकतील असे अातले स्फटीकीय गोल हे या सिद्धांताचे मूख्य रूप होते.
भारतीयांकडे या सिद्धांताची स्वत:ची आवृत्ती होती. त्यांच्या सिद्धांतात ग्रहांसाठी अदृश्य स्फटीकीय गोल नव्हते. खगोलीय गोलाला ब्रह्माण्ड असे संबोधले जाई। ज्याला बहुधा एक भौतिक अक्ष होता. या अक्षाबाबतचे लिखाण भारतातील तीनही धर्मांच्या साहित्यातून मिळतो. तीन्ही धर्मांच्या अनेक ग्रंथांमध्ये मेरू पर्वताची संकल्पना आढळते. त्या काळात आकलनात असलेल्या ब्रह्माण्डाच्या त्रिज्येइतकी या पर्वताची उंची दिलेली अाहे. बुद्ध आणि जैन धर्मांचे अनुयायी हा पर्वत पृथ्वीखाली दक्षिण दिशेस असल्याचे मानत असत. संपूर्ण अंतरिक्ष मेरू पर्वताची प्रदक्षिणा करत असल्याचंही यांचं अनुमान होते.
कदाचित पूर्वेतिहासिक काळात माणसाने ताऱ्यांची गणना सुरु केली असावी. तेव्हा ताऱ्यांच्या समूहाला ओळखीच्या प्रतिमांची नावे दिली असावी. हळूहळू खगोलीय विषुववृत्तावरील ताऱ्यांच्या समूहांची पुनर्विभागणी केली गेली. समकोन असलेल्या अशा १२ समूहांमध्ये त्यांना विभागले गेले आणि त्यांना राशी असे संबोधले गेले. यातलं प्रत्येक राशी सौर दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याचं प्रतिनिधित्व करत होती. भारतीय दिनदर्शिका प्रणाली मात्र वेगळ्या प्रकाराने विकसित होत होती. त्यांचं लक्ष चंद्राच्या स्थानावर केंद्रित असल्याने सौर वर्षाच्या या दुरुस्त्यांना गृहीत धरून त्यांनी चंद्र दिनदर्शिका बनवली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी गृहीत धरलेले ताऱ्यांचे समूह वेगळे झाले. त्यांना नक्षत्र असे म्हटले गेले. एक दिवसात होणाऱ्या चंद्राच्या प्रवासाशी प्रत्येक नक्षत्र असा तो संबंध लावला. काव्यात्मकरित्या नक्षत्रे स्त्रीरूपी आणि चंद्र हा पतीरूपी कल्पिला गेला. जो त्यातल्या प्रत्येकीसोबत एक दिवस वास्तव्य करत असे अशी कल्पना केली गेली.
मेरू द ॲक्सिक्स हे चित्र मेरू आणि या नक्षत्रांच्या अशा कथांवर आधारित आहे. त्यासोबत असलेले युगांत हे चित्र खंडित अक्षाची शक्यता दाखवते.
युगांत: खंडित अक्ष

सूर्याचा स्फोट होऊन तो पृथ्वीला गिळंकृत करण्याइतका विस्तृत होईल . आपलं हे युग लोप पावेल. जेव्हा जगाचा अक्ष भंग पावेल तेव्हाही युगांत होईल.
एका भारतीय आख्यायिकेनुसार मेरू पृथ्वीच्या उत्तरेस आणि दक्षिणेस, दोन्ही दिशांना होता. मेरू पर्वताचा वरच्या भागात असलेला अंश खंडित होऊन पृथ्वीवर कोसळला आणि त्यातून लंकेची निर्मिती झाली.
त्याचप्रमाणे खालच्या भागात असलेला अंशसुद्धा भंग पावू शकतो अशी या चित्राची कल्पना आहे. यामुळे विश्वाचा अंत होईल. चित्रात हीच बाब साकारली असून इतर प्रतिक्रियाही रेखाटल्या आहेत.
युगांत नावाच्या मालिकेची ही चित्रं मुख्य चित्राची सोबत करतात. मुख्य चित्रात असलेल्या संकल्पनेच्या अनुषंगाने कल्पिलेली ही चित्रे आहेत. एका युगाचा अंत हा युगांत या शब्दाचा नेमका अन्वयार्थ होय. या मालिकेत युगांत म्हणजे विश्वाचा अंत.