विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
मेरू एवढ्या अजून एका भव्य पर्वताचे अस्तित्वाचे भाकीत आख्यायिकेतून होते. क्षीरसागरात हा पर्वत उभा आहे आणि समुद्रमंथनासाठी त्याचा रवीसारखा वापर केला गेला होता. खगोलीय दुधाच्या समुद्रातून मंथनातून चंद्र उपजला अशी दंतकथा अाहे.
मंदार पर्वत हा मेरु पर्वतांपेक्षा जास्त गूढ आहे.. मेरूचा अर्थ ॲक्सिक्स या त्याच्या इंग्रजी प्रतिशब्दांच्या अगदी नजीकचा आहे. मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा. मंदार या शब्दाचा अर्थ म्हणजे एक स्वर्गीय वृक्ष.
समुद्रमंथन या आख्यायिकेत मंदार पर्वताचा उल्लेख आहे. यात दुधाच्या समुद्रात मंथनासाठी मंदार पर्वताचा वापर केला होता. तसेच आकारमानात मेरुपर्वाच्या तोडीस तोड ठरणारा हा पर्वत आहे. त्यामुळे हा पर्वत ऐहिक नसून विश्वात खगोलीय दुग्ध समुद्राच्या जवळ असणारा एक असावा असा आख्यायिकेचा अर्थ होऊ शकतो.
चित्र हे दोन्ही पर्वत आणि खगोलीय दुग्ध समुद्र दर्शवते.