दैवी युगुल

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

चेतना आणि विश्व यांची जोडी अविभाज्य आहे. चेतनेशिवाय विश्वाची कल्पना करणंच व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे विश्वाशिवाय चेतनेचा अंदाज लावणं तेवढंच निष्फळ आहे. “दैवी युगुल ही विश्व आणि चेतना या दोन्ही बाबींचं मूळ आहे” असं काव्यात्मकरित्या सांगणारी  दंतकथा म्हणजे दैवी युगुल. 

ऋग्वेदातील नासदीय सूक्तात  वास्तव विश्वाच्या व्युत्पत्तीच्या प्रश्नावर काही  ऋचा आहेत.   जीवनाची वा चेतनेची सुरुवात कशी झाली?  या प्रश्नाचा शोध आदिम काळापासून माणूस घेत आहे. यामुळेच कदाचित जगभरात याच प्रश्नावर अनेक दंतकथा आकारास येऊ लागल्या. जीवनरहित वास्तवापासून चेतनात्मक जीवन कसे अाले हे धुंडाळणाऱ्या सर्व दंतकथांना कायमंच एका किंवा अनेक जोड्यांची गरज भासते. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम तत्त्वज्ञानाने ॲडम आणि इव्ह या जोडीस उगम मानले. मेसोपोटेमिया येथील दंतकथांचा सुद्धा अशाच प्रकारच्या पहिल्या जोडीवर भर आहे. काही वेळेस ही पहिली जोडी दैवी असते. 

हिंदू दंतकथांमध्ये, मुख्यत्वे सांख्य संप्रदायात पुरुष आणि प्रकृती या वैश्विक जोडीशी उगम जोडला जातो. या वैश्विक जोडीच्या मिलनातून अखंड विश्व आणि जीवनाचा उदय झाला असे मानले जाते. भगवतगीता आणि हिंदू धर्माच्या अनेक मुख्य ग्रंथांमध्येसुद्धा पुरुष आणि प्रकृती या जोडीचा उल्लेख आहे. याचप्रमाणे या विश्वाची स्थापना करण्यात शिवशक्ती यादेखील वैश्विक जोडीचा हातभार लावला गेला आहे असे मानले जाते.

“पुरुष म्हणूनच आत्मा असून प्रकृती एक भौतिक बाब आहे. पुरुष एक सत्व आहे आणि त्या सत्वास मन, शरीर आणि विश्वाने लपेटून घेणारी ती प्रकृती आहे,” असे देवदत्त पटनाईक म्हणतात. 

प्राचीन खगोलशास्त्रात सुद्धा जोडीची ही संकल्पना आहे. राशीचक्रातील मिथुन ही रास एक अशीच.   डीएनए रेणूतील २ रेषा ही सुद्धा एक जोडीच आहे. 

अशा सर्व आख्यायिकेपासून या चित्राने प्रेरणा घेतली आहे. 

या चित्राला सोबत करणारं युगांत हे भांडणाचं प्रतीक आहे. जर एखादी जोडी हा जीवनाचा उगम असेल तर वादांमुळे ही जोडी तुटणं याच जीवनाचा अंत करू शकतं . चित्राची प्रेरणा यात आहे.

अजून एका चित्राचे रेखाटन असे आहे.  (हे चित्र या प्रदर्शनाचा भाग नाही).

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *