विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
आख्यायिकेनुसार स्वर्ग आणि पृथ्वी यांना एकत्र धरून ठेवण्याचं ओझं ॲटलासवर लादलं गेलं होतं. बहुतांश संस्कृती सात स्वर्ग आणि सात नरक यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. भारतीय दंतकथांमध्ये पाताळ हा सातवा नरक होय.
अंतरिक्षातील गोल धरून ठेवण्याची शिक्षा ॲटलासला फर्मावली गेली होती. या अंतरिक्षातील गोलात किंवा भारतीय पुराणकथांमध्ये संबोधिलेल्या ब्रह्माण्डात विश्वातील सर्वच गोष्टींचा समावेश होतो. यात सात विवरं/नरक आणि सात स्वर्ग अंतर्भूत होतात.
अतल, वितल, सुतल,तलातल, महातल, रसातळ आणि पाताळ अशी या सात पाताळांची नावे. भूलोक(पृथ्वी), भुवरलोक, स्वरलोक, महर्लोक, जनर्लोक, तपोलोक आणि सत्यलोक अशी सात स्वर्गाची नावे. ज्यू आणि मुस्लिम धर्मांमध्येही सात स्वर्गाची ही संकल्पना मांडली गेली आहे.
अनेक संस्कृतींमध्ये ग्रहांना सजीवाचे अस्तित्व दिले गेले आहे. खगोलीय अवकाशातील त्यांची असलेली अनियमित हालचाल हे त्यामागचे कारण असू शकते.
या सर्व कल्पना या चित्रास प्रेरणादायी ठरल्या आहेत.
या चित्रास सोबत करणारी परिस्थिती म्हणजे ॲटलासला हा अंतरिक्षातील गोल धरून ठेवण्यात आलेलं असामर्थ्य. परिणामी होणारा युगांत या चित्रात रेखाटला आहे.