विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
अंतरिक्षातील सापांनी पृथ्वी आणि इतर ग्रहांना त्यांच्या मस्तकावर धारण केले आहे. अंतरिक्षातील ग्रहांच्या हालचालीसाठी गारुडी या सर्पांना हालचाल करण्यास उद्दयुक्त करत आहे.
पृथ्वीला असलेल्या आधारात सापाची क्वचितंच गणना होते. शेष या वैश्विक सर्पामुळे पृथ्वीची निर्मिती झाली असं महाभारताच्या अरण्यपर्वातील एका आख्यायिकेत म्हटलं आहे. बैल, कासव, हत्ती यांच्यासारख्या भक्कम आधारांऐवजी सापासारखा लवचिक आणि अरुंद असा आधार पृथ्वीस वारंवार हलवित असल्याची कल्पना केली जाऊ शकते. साप जमिनीच्या खाली राहतात या वस्तुस्थितीतून कदाचित पृथ्वी धारण करणाऱ्या सापांची आख्यायिका आली असावी. आणि पृथ्वीस आधार देणारा तो कोणतातरी जमिनीखाली राहणारा प्राणी असावा.
हे चित्र एक दंतकथा नसून एक कल्पना आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर सर्व ग्रहांना धारण करण्यात सापांची लवचिकता महत्वाची ठरते. या विश्वातील सर्वच गोष्टी जागच्या जागी राहाव्यात यासाठी बहुधा गारुडी सापांना उत्तेजित करत आहे.
या चित्राच्या युगांत सोबतीला ‘डिस्टर्बन्स ऑफ स्नेक्स’ ( सापांची हालचाल) अाहे. सापांच्या चंचल वृत्तीवर चित्राचा भर आहे.