विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
बहुतेकशा पूर्वीच्या आख्यायिका पृथ्वीला प्राण्यांचा आधार आहे असे सांगतात. अनेक प्राण्यांपैकी एक म्हणजे कासव. कासवाला कसला आधार आहे? बर्ट्रांड रसेल याने दिलेलं सुजाण उत्तर म्हणजे कासवावर कासव अगदी शेवटपर्यंत कासवं.
शेवट पर्यंत उकल नसलेले विरोधंभासात्मक अनेक प्रश्न असतात. त्यातील एक प्रश्न म्हणजे आधी कोंबडी का आधी अंडं? यासारखांच दुसरा प्रश्न म्हणजे कशास काय कारणीभूत ठरतं. जर एखाद्या ठिकाणी धूर असेल, तर तिथे आग लागलेली असते. जर तिथे आग लागली असेल, तर कोणीतरी ती लावली असेल. जर कोणीतरी ती लावली असेल, तर तिथे कोणीतरी आहे. जर तिथे कोणीतरी आहे, तर तिथे कोणीतरी अन्न शिजवत असेल. अशा प्रकारची ही कारणांची मालिका ही कधीच संपत नाही.
पृथ्वीला आधाराची गरज आहे असे समजले जात होते. भूकंपादरम्यान पृथ्वीची जोरदार हालचाल होत असल्याने हा आधार सजीव असणे आवश्यक आहे. काहींनी बैलाच्या रूपात तर काहींनी साप, राक्षस, मासा या रूपात या सजीवाची कल्पना केली. अशाच कल्पनेतलं एक म्हणजे कासव. पण कोंबडी आणि अंड या प्रश्नाप्रमाणेच आधाराचा प्रश्न संपत नाही. कासवाला कशा प्रकारे आधार मिळाला असेल? तर त्याच उत्तर म्हणजे दुसऱ्या कासवामुळे. टर्टल्स ऑल द वे (शेवटपर्यंत कासवँ) या सुजाण उत्तरातून आधाराची अव्याहतता अपेक्षिणे चुकीचे आहे हे कळते. . बर्ट्रांड रसेल याने या वाक्प्रचाराचा उल्लेख त्याच्या ‘व्हाय आय ॲम नॉट ख्रिश्चन’ (मी ख्रिस्ती का नाही ) या पुस्तकात केला आहे.
काही समुद्रातील कासवांच्या जाती समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूत त्यांची अंडी उबवतात. कधीकधी असं होतं की सगळ्या कासवांची पिल्लं एकाच वेळी अंडी फोडून बाहेर येतात आणि अशी हजारो कासवांची पिल्लं समुद्राशी पोहोचतात. ही घटना सुद्धा या चित्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
आजकाल समुद्रातील या कासवांना संरक्षण दिलं गेलं आहे. पण शिकारी येऊन अशा अनेक कासवांच्या पिल्लांना पकडून नेत असल्याची वस्तुस्थिती काही फार जुनी नव्हे. याच्या सोबतीस असलेले चित्र अशी परिस्थिती चित्रित करत आहे की शिकारी या शिकार केलेल्या कासवांना भाजत आहे आणि त्यानंतरच्या मेजवानीसकटंच या जगाचा अंत होत आहे. (या चित्राचे छायाचित्र येथे नाही)
धीमा आणि अविचल
मालिकेतील दुसरं सोबत करणारं चित्र म्हणजे स्लो अँड स्टेडी ( धीमा आणि अविचल). टेकडी चढणाऱ्या कासवासारखी जगाने केलेली प्रगती ही धीमी असली तरी अविचल आहे.