विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
सात समुद्र समकेंद्री असलेल्या सात वर्तुळांसारखे आहेत आणि त्यांच्यामध्ये जमीन आहे असे पूर्वीच्या काळी मानले जाई. जे आजच्या आपल्या आकलनाच्या अगदी विरुद्ध आहे. मिठाचे खारे पाणी, उसाचा रस, द्राक्षासव, तूप, दही, दूध आणि गोडं पाणी अशांचा या सात समुद्रात समावेश होई. या सात समुद्रांच्या दरम्यान सात भूभाग होते.
सद्य काळातल्या भारतीय साहित्यात सातासमुद्रापार या संज्ञेचा अनेकदा उल्लेख येतो. याचा सर्वसामान्यपणे अर्थ सात समुद्रांच्यापलीकडची जमीन असा होतो. इतर संस्कृतींमध्येही सात समुद्र ही एक लोकप्रिय कल्पना होती. अनेक व्यावसायिक उत्पादनांमध्ये आजही या संज्ञेचा वापर होतो. आजच्या भूगोलानुसार एकतर सातहून कमी किंवा जास्त समुद्र आहेत. पण हे नेमके सात समुद्र आज नाहीत. कदाचित प्राचीन किंवा मध्ययुगात दर्यावर्दींनी या संज्ञेला जन्म दिला असावा.
पृथ्वी सपाट आहे आणि ती एखाद्या चकतीसारखी आहे या मूलभूत संकल्पनेतून सात समुद्र आणि सात भूभाग ही कल्पना उदयास येते. भूगोल वर्णम नावाच्या पुस्तकात समुद्र आणि भूभागांचे वर्णन केले आहे. यात समुद्र हे आजच्यासारखे खाऱ्या पाण्याचे नसून द्राक्षासव, उसाचा रस, दूध अशा मोहक द्रव्यांचे आहेत.
दंतकथांमध्ये कल्पिल्याप्रमाणे मात्र सपाट पृथ्वी हे चित्र दर्शवत नाही. या चित्रात किंचित वक्राकार पृष्ठभाग असलेली आंशिक स्वरूपात गोल असलेली चकती आपल्याला दिसून येते. अक्षांश आणि पृथ्वीच्या वक्राकाराबाबत समुद्राच्या अभ्यासकांचे जे ज्ञान आहे त्याला लक्षात घेऊन हे रेखाटन केले आहे. वक्राकार चकतीसारख्या असलेल्या या रेखाटनातून एका छत्रीचा प्रत्यय येतो जिची काठी म्हणजे मेरू पर्वत आहे. सात समुद्रातील एक समुद्र दुधाचा असल्याने मंडल पर्वत एका सापासोबत दर्शवला आहे, ज्यात मंथन करणाऱ्या एखाद्या तारेची उपमा सापाला दिली आहे.
सोबत असणारं चित्र असा दर्शवतं की छत्रीधारकाला आता गरज नसल्याने त्याने छत्री बंद केली आहे.
युगांत: बंद केलेली छत्री