विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
पायी प्रवास करत मृत्यूस सामोरं जात असताना नचिकेताच्या समोर एक कालचक्र आलं. अविरत चालणाऱ्या त्या यंत्राने नचिकेतास चक्रावून टाकले. ती खरंच एक यंत्रणा होती की साक्षात वास्तववादी जगंच होतं?
नचिकेताचं हे मृत्यूस सामोरं जाणं ही भारतीय तत्वज्ञानातील एक केंद्रस्थानी असलेली आख्यायिका आहे. कठोपनिषदात या कथेचा उल्लेख येतो. या कथेत एक लहान मुलगा मृत्युदेवतेस भेटतो आणि मृत्यूपासून भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाची बाब शिकतो.
इतर ग्रंथांमध्ये ही दंतकथा कदाचित अधिक स्पष्टपणे रेखाटलेली आहे. याच कथेच्या मी वाचलेल्या एका आवृत्तीत नचिकेत सर्वात अवघड असा प्रवास पायी करत आहे असे आढळते. मृत्यूच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी नचिकेत अनेक पाताळांमधून (विवरांमधून) प्रवास करतो. जसा तो मृत्यूच्या निवासस्थानाजवळ पोहोचतो तसं चित्तवेधक वैशिष्ट्य असलेलं चक्र त्याच्या नजरेस पडतं. यानंतर हेच ते काळचक्र आहे हे त्याला उमजतं.
संस्कृत भाषेत काळ याचा सामान्यपणे अर्थ ‘वेळ’ असा होतो. नचिकेताच्या जे दृष्टीस पडले ते काळचक्र होते. तथापि काळ याचा अर्थ मृत्यू असाही होतो. कदाचित यातून असे सूचित होत असेल की काळाचे बंधन मृत्यूस देखील चुकलेले नाही. म्हणूनच मृत्यूच्या निवासस्थानाजवळ या काळचक्राशी पडलेली गाठ मूळच्या कथेचा भाग नसली तरी अत्यंत तार्किक आहे.
हे चित्र मी वाचलेल्या कथेपासून प्रेरणा घेतं. मी कल्पिलेलं काळचक्र हे द्विमितीय चक्र नसून ब्रह्माण्डासारखं आहे. मृत्यूच्या निवास स्थानाच्या पार्श्वभूमीवर नचिकेत बारकाईने सर्व हालचाली टिपत आहे.
सोबत असलेलं चित्र नचिकेताचा मेरू पर्वत उतरून पाताळात जाणारा प्रवास दाखवतो.