विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
पृथ्वीला आधाराची गरज नाही असे प्रतिपादन करणाऱ्या अनेकांपैकी अनाक्सिमॅण्डर हा पहिला होता. त्याच्या कल्पनेनुसार जग यांत्रिक होतं आणि पृथ्वी दंडगोलाकार होती. सूर्य आणि चंद्र हे आकाशाच्या पलीकडे होते. जगाचा नकाशा तयार करणाऱ्या अनेकांमध्ये अनाक्सिमॅण्डर हा पहिला होता.
कार्ल पॉपर असं म्हणतो, ” अनाक्सिमॅण्डरची ही कल्पना मनुष्याच्या चिंतनाच्या इतिहासातल्या अनेक कल्पनांमधली सर्वात धाडसी, क्रांतिकारी आणि अभूतपूर्व आहे.”
सॉक्रेटिसच्या पूर्वीच्या काळातल्या या (अनाक्सिमॅण्डर) तत्वज्ञानीच्या विश्वाबद्दलच्या कल्पना अतिशय अद्वितीय होत्या. त्याच्या कल्पना निरीक्षण आणि तर्क यावर आधारलेल्या होत्या. अंतरिक्षात कशाचाच आधार नसलेली पृथ्वी ही दंडगोलाकृती आहे असे तो मानत असे. आकाश आणि तारे हे पृथ्वीस सूर्य आणि चंद्राहून जास्त जवळ आहेत असे त्याचे मत होते. हालचालींची नियमितता असलेली त्याची विश्वाची प्रतिकृती यांत्रिक होती.
तोपर्यंत ज्ञात असलेल्या निरीक्षणांतून आणि तर्काद्वारे त्याच्या प्रत्येक कल्पनेकडे पाहिले जाऊ शकते. त्याने आधाराच्या चिरस्थायी असणाऱ्या गरजेच्या समस्येचा अभ्यास केला ( टर्टल्स ऑल द वे म्हणजेच सगळीकडे कासवं या संज्ञेतून ज्याचे वर्णन केले आहे). पृथ्वीला आधाराची गरज नाही हे त्याने यांचपासून काढलेले तार्किक अनुमान होय. सॉक्रेटिस पूर्व काळात सपाट पृथ्वी ही कल्पना बऱ्यापैकी प्रचलित होती. प्रवाशांच्या तसेच कदाचित त्याच्या स्वतःच्या खगोलशास्त्रीय निरीक्षणांच्या नोंदींतून ‘पृथ्वी किमान एका दिशेत तरी वक्राकार आहे’ असे त्याने अनुमान काढले. त्याच्या जग कल्पनेत पूर्णांकाचे महत्व होते. यावरून तो एक हुशार गणितज्ञ असावा असे वाटते.
त्याच्या यांत्रिक विश्वाच्या संकल्पनेपासून या चित्राने प्रेरणा घेतली आहे.
या चित्रास सोबत करणारं चित्र युगांत हे आहे.
युगांत: अनाक्सिमॅण्डर्स क्लॉक स्टॉप्स ( युगांत: अनाक्सिमॅण्डरचं थांबलेलं घड्याळ )
अनाक्सिमॅण्डरचं विश्व हे एका घड्याळाप्रमाणे दाखवलं आहे. जर किल्ली दिली गेली नाही तर ते घड्याळ बंद पडेल. या चित्रात घड्याळाचा मालक पहुडलेला असल्याने कोळीष्टिके लागलेलं बंद पडलेलं घड्याळ दाखवलं आहे.