आभासी जग

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

आपल्या पैकी प्रत्येक जण स्वतःच्याच एका दुनियेत राहत असतो. मुळात जग हे असं खऱ्याअर्थी अस्तित्वात नसतंच. ते खरं तर आपल्या कल्पनेचा एक भाग आहे. सत्य असं काही नसतंच, आपणंच ते असतो. 

जिंदगी ख्वाब है, ख्वाब में झूठ क्या और भला सच है क्या ( आयुष्य हे एक स्वप्न आहे. या स्वप्नात खोटं असं काहीच नसतं आणि खरं तरी काही असतं का! )

चिद्वादाचे मूलभूत तत्व हे आहे की जग पाहणाऱ्याच्या संवेदनातच आहे.  संपूर्ण जग आपण आपल्या कल्पनेतून रेखाटतो. मुळात जग हे असं खऱ्याअर्थी अस्तित्वात नसतंच तर ती आपली एक कल्पना असते. जरी चिद्वादाच्या सिद्धांताचं अनेकांना आश्चर्य वाटत असलं तरी तर्क आणि निरीक्षणांनी आपण त्यास खोटे ठरवले जाऊ शकत नाहीॊ

चिद्वाच्या या सिद्धांताचा काही भारतीयांचाही पाठींबा होता. हिंदू आणि बौध्द या दोहोंमध्ये चिद्वाची  मूल्ये आढळतात. शंकराचार्यांच्या वेदांत तत्त्वज्ञानाने ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ ही संज्ञा मांडली आहे. ‘जग खोटं असून फक्त ब्रह्म हे सत्य आहॆ’ असा त्याचा कदाचित अर्थ असावा. ‘ द मॅट्रिक्स ‘ हा चित्रपट सुद्धा चिद्वाद दर्शवतो. 

आदर्शवादाच्या या संकल्पनेपासून या चित्राने प्रेरणा घेतली आहे.

युगांत: कल्पनेचा अंत

आपल्या विचारांचा प्रभाव कदाचित आपल्या आकलनशक्तीवर पडत असावा. आपल्या विचारांवर कशाचा प्रभाव पडत असेल? कदाचित ही संपूर्ण विद्युतप्रणाली आपल्या विचारांवर आणि परिणामी आपल्या विश्वावर प्रभावशाली ठरत असेल. जर वीजपुरवठा बंद झाला तर आपले आकलन संपेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *