महास्फोट

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

एका विलक्षण अशा ठिपक्यापासून (पॉईंट सिंग्युलॅरिटी) जगाची निर्मिती झाली. महास्फोट झाला आणि त्यातून विश्व निर्माण झाले. हे विश्व म्हणजे एका चारमितीय गोलाचा पृष्ठभाग होता. या आवाज एवढा शक्तिशाली होता की अजूनही पार्श्वभूमीवरच्या किरणोत्सर्गाद्वारे आपल्याला त्याचे प्रतिध्वनी ऐकू येतात. 

बेल्जियमचे भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज लेमॅटर यांनी पहिल्यांदा महास्फोटाचा  सिद्धांत मांडला. जगभरातल्या सर्वांच्याच निरीक्षणातून आपण तारे आपल्यापासून दूर जात आहेत असं अनुमान काढत आलोय. त्यांची गती त्यांच्या अंतराशी संबंधित आहे. याचाच अर्थ असा की तारे जेवढे दूर आहेत तेवढ्याच अधिक गतीने ते आपल्यापासून लांब जात आहेत.  

जॉर्ज लेमॅटर यांना कॅथलिक धर्मोपदेशकाचे सुद्धा प्रशिक्षण दिले गेले होते. त्यांनी नंतर महास्फोटाचा हा सिद्धांत मांडला. तारे दूर जाण्याच्या या प्रक्रियेचा अर्थ लावताना त्यांनी सुरुवातीस या सर्वच गोष्टी एकमेकांच्या जवळ असाव्यात या तर्कावर भर दिला. महास्फोटाचा हा सिद्धांत विश्वाची सुरुवात एका ठिपक्यापासून झाली असा विचार मांडतो. जोरदार स्फोट  होऊन या ठिपक्याचा विस्फोट झाला. आपल्या संपूर्ण विश्वाचा उदय या ठिपक्यापासून झाला. 

कदाचित ‘मोठा आवाज’ ही कल्पना ख्रिश्चन धर्मातली निर्मिती(चराचर सृष्टीची) ची एक दंतकथाही असेल. थॉमस ॲक्विनासच्या ‘फर्स्ट कॉज ॲग्रीमेंट’ (पहिला कारण करार) मध्येही या कल्पनेचे मूळ कदाचित असू शकेल. 

चित्राने या सर्व बाबींपासून प्रेरणा घेतली आहे तसेच त्यात मोठया आवाजास काय कारणीभूत ठरले याचीही कथा आहे.

हे विश्व एखाद्या फुग्यासारखं आहे हे आपण सर्वच जण जाणतो. या फुग्यात एकमेकांसारख्या दिसणाऱ्या आकाशगंगा आहेत. त्यातसुद्धा तारे असलेल्या किंवा तारे, ग्रह, उपग्रह असलेल्या अनेक रचना आहेत. हीच मांडणी छोट्या स्वरुपातसुद्धा वारंवार आढळते. यावरून विश्वाचे स्वरूप फ्रॅक्टल आहे असेही गृहीत धरले जाऊ शकते. हे चित्र याच फ्रॅक्टल स्वरूपाचं मूळ मोठ्या आवाजाच्या सिध्दांतात शोधून काढण्याचा प्रयत्न करतं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *