विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
हे विश्व धीम्या गतीने पण सातत्याने एका विलक्षण प्रकारे विस्तारत आहे. या विश्वाच्या विस्ताराचा केंद्रबिंदू निरीक्षणात अजून तरी आलेला नाही. हे विश्व त्यातील हरेक बिंदूपासून सममितीने विस्तारात आहे असे दिसून येते. विश्व ज्याच्या पृष्ठभागावर आहे अशा विस्तृत पावणाऱ्या फुग्याच्या चित्रातून याची नेमकी प्रचिती येईल.
मोजमापणीमधील अनेक तज्ञांपैकी एडविन हबल हा एक महान तज्ञ होता. अतिशय परिश्रमपूर्वक अशा मोजमापणीतून त्याने आधुनिक विश्वाचे कोडे सोडवले होते. विश्वाच्या या कोड्यास त्याने दिलेले उत्तर सर्वांना अचंबित करणारे होते. त्याच्या पूर्वीच्या अभ्यासकांनी ज्याची कधी कल्पनाही केली नसेल असा एक विशिष्ठ आकार या विश्वाचा असल्याचं त्याने सिद्ध केलं. त्याचे समकालीन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज लेमॅटर आणि स्वतः एडविन हबल यांनी सद्य विश्व विस्तार पावत आहे असा सिद्धांत मांडला. पुढे जाऊन स्वतःच्या अचूक मोजमापणीच्या सहाय्याने ‘हबल कॉन्स्टन्ट’चा ( हबल अविरततेचा) सातत्याने होत असलेला विस्तार त्याला आढळला.
हे विश्व सातत्याने सममितीने विस्तारत आहे असे हबलला दिसून आले. त्याचा दुसरा शोध हा अधिक विस्मयकारक होता. ताऱ्याचे पृथ्वीपासूनचे अंतर आणि पृथ्वीपासून दूर जाण्याचा वेग याचा एकमेकांशी संबंध असल्याचा शोध त्याने लावला. हा वेग या अंतराशी थेट जोडला गेला आहे असे प्रतिपादन त्याने केले. सामान्य त्रिमितीय जगात या विस्तार प्रक्रियेचं काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं करणं किचकट होतं. त्याचा शोध हा त्रिमितीय पृष्ठभाग असणाऱ्या चारमितीय अंडगोलासाठी जास्त योग्य होता. विश्वाच्या या नमुन्याने हबलच्या निष्कर्षांचे अचूक आकडे दिले.
चारमितीय अंडगोलाची कल्पना करणे अतिशय जिकिरीचे होते. याची योग्य उपमा फुग्याच्या उदाहरणातून देता येईल. विश्व म्हणजे एक ठिपके असलेला फुगा अशी कल्पना करा. हे ठिपके म्हणजे तारे आणि आकाशगंगा होय. फुग्याला एकसमान वेगाने फुगवले जात आहे आणि फुग्यावरचे ठिपके एकमेकांपासून दूर जात आहेत. या ठिपक्यांचं असं एकमेकांपासून दूर जाणं हे हबलच्या विश्वाच्या निरीक्षणासारखं आहे.
चित्राने हबलच्या विश्वाच्या या प्रमेयापासून प्रेरणा घेतली आहे.