विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
आपण जगास आपल्या निरीक्षणांपर्यंतंच सीमित करतो. ज्याचे आपण निरीक्षण करत नाही ते वास्तव नसते. निरीक्षणाच्या प्रक्रियेप्रमाणे वास्तव बदलते. श्र्यॉडिंगरची मांजर कधी मृत असते तर कधी जिवंत. एकाच वेळी एकाहून अधिक जगं अस्तित्वात असतात.
वास्तवास कसली मर्यादा असते? जग अस्तित्वात आहे आणि त्याचे निरीक्षण करता येते ही वास्तववादाची गरज आहे. पण या निरीक्षणांच्या पल्ल्याडही वास्तव आहे का? जर्मन शास्त्रज्ञ हायझेनबर्ग यांनी त्यांच्या प्रसिद्ध अशा अनिश्चिततेच्या तत्वातून एक तत्वज्ञानीय क्रांतीचीच सुरुवात केली. पुढे जाऊन या सिद्धांतातून ‘वास्तववादी जग हे आपल्या निरीक्षणांपर्यंतंच सीमित असतं’ या तत्वज्ञानाला मान्यता मिळाली.
दररोजच्या भाषेत सांगायचं झालं तर काम करायला कोणी कार्यालयात गेलंच नाही तर कार्यालय अस्तित्वातंच नसेल. यालाच टोकाचा वास्तववाद असे म्हणता येईल. यातूनंच ज्याला ‘श्र्यॉडिंगर्स कॅट पॅराडॉक्स’ (श्र्यॉडिंगरच्या मांजरीचा विरोधाभास) म्हणतात अशी विरोधाभास असलेली परिस्थिती निर्माण झाली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ वर्नर श्र्यॉडिंगर यांनी हा विरोधाभास मांडला. या त्यांच्या स्पष्टीकरणात मांजर ही कधी मृत असते तर कधी जिवंत असते.
याचाच अर्थ लावताना आढळलेलं अजून एक तत्वज्ञानीय स्पष्टीकरण म्हणजे ‘ मल्टिपल वर्ल्डस इंटरप्रिटेशन'( अनेक जगांचं स्पष्टीकरण). सोप्या शब्दात सांगायचं तर काम करायला कोणी कार्यालयात गेलंच नाही तर कार्यालय अस्तित्वातंच नसेल असं एक जग असेल आणि दुसऱ्या एका जगात कोणी जात नसूनही कार्यालय मात्र अस्तित्वात असेलही. ज्या जगात हे कार्यालय अस्तित्वात नसतं ते जग संपून जातं जेव्हा तुम्ही त्या कार्यालयाचं निरीक्षण करता.
वास्तवाच्या तत्वज्ञानीय स्पष्टीकरणावर चित्र आधारलेलं आहे.
सोबतीचं चित्र:
युगांत: वर्ल्डस एन्ड इन ऑब्सर्वेशन ( युगांत: निरीक्षणातून होणारा जगाचा अंत)
अल्बर्ट आईनस्टाईनचा क्वांटम मेकॅनिक्स च्या तत्वज्ञानास आणि विज्ञानास विरोध होता. क्वांटम मेकॅनिक्सचे विज्ञान त्याच्या या टीकेसमोरही टिकून राहिले. तो असं अनेकदा म्हणायचा की ‘ गॉड डझ नॉट प्ले डाईस'( देव हा काही फासे टाकत नाही).
क्वांटमची अनेक विश्वं हे कदाचित वास्तवाचे स्पष्टीकरण असू शकते. वास्तविक निरीक्षणातून आयुष्याची शक्यता संपून जाते. निरीक्षण हे अनेक अशा संभाव्य शक्यतांचा विनाश करतं. हे वाक्य या चित्राची प्रेरणा आहे.
पुढील चित्र या प्रदर्शनाचा भाग नसून ते सिंथेटिक बोर्ड वर आहे.