विश्व एक अवलोकन क्रमवारी पुढील चित्र
प्रसिद्ध शास्त्रज्ञ हॅले याने पृथ्वी ही आतून पोकळ असून तिच्यात अजून एक विश्व असू शकतं असं भाकित केलं. मध्ययुगात काही जाणकारांचाही या कल्पनेवर विश्वास होता.
विवरांची कल्पना अनेक संस्कृतींमध्ये अनेक शतके टिकून राहिली. काही प्रवासी पृथ्वीच्या खाली जाऊन या विवरांना भेट देऊन आल्याचा दावा करतात. पाताळांवर ( विवरांचं दुसरं नाव) सापांचे राज्य आहे असे भारतीय पौराणिक कथेत म्हटले आहे. बळीराजाने सिंहासन सोडले आणि तो या विवरांवर राज्य करायला गेला.
एडमंड हॅले हा आयझॅक न्यूटन चा सहकारी शास्त्रज्ञ होता आणि त्याचा कदाचित या विवरांवर विश्वास असावा. याच सुमारास एक मोठी वैज्ञानिक क्रांती जन्म घेऊ पाहत होती. कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री रचनेची गणित आणि भौतिकशास्त्राच्या माध्यमातून कारणमीमांसा करण्यात न्यूटन व्यस्त होता. जेव्हा पृथ्वीकेंद्री रचनेचे समर्थक कमकुवत ठरत होते तेव्हा विवराच्या या कल्पनेचा कुठेतरी पराभव होत होता.
हॅले हा एक जिज्ञासू खगोलशास्त्रज्ञ होता ज्याच्या धूमकेतूंच्या नियमित हालचालीच्या शोधामुळे सूर्यकेंद्री विश्वाची कल्पना दृढ झाली. त्याने न्यूटनच्या आधी कदाचित गुरुत्वाकर्षणाच्या कल्पनेचा अभ्यास केला असावा. नंतर त्याने गुरुत्वाकर्षण आणि गती याबाबतच्या न्यूटनच्या कल्पनांना प्रकाशित करण्यासाठी न्यूटनला उद्युक्तही केले.
विवरं कुठे असावीत ही त्याच्यासाठी एक विस्मयकारक बाब होती. तेव्हा ही विवरं पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली आहेत असा सिद्धांत त्याने मांडला. पृथ्वीचा हा गोल पोकळ आहे आणि त्यात विवरांचं जग आहे असं प्रतिपादन त्याने केलं. पोकळ पृथ्वीच्या कल्पनेचा अनेकांवर प्रभाव पडला. ‘जर्नी टू अर्थ’स सेंटर’ ( पृथ्वीच्या केंद्राकडे प्रवास) याबाबतचा नुकताच आलेला चित्रपट आणि हेच शीर्षक असलेलं ज्यूल्स वर्न चं पुस्तक हे पोकळ पृथ्वीच्या कल्पनेवर आधारित आहे.
चित्र हीच कल्पना एका वेगळ्या स्वरूपात दाखवतं जिथे अनेक विश्वं एकमेकांमध्ये पहुडलेली आहेत.