शेवटपर्यंत कासवं

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

बहुतेकशा पूर्वीच्या आख्यायिका पृथ्वीला प्राण्यांचा आधार आहे असे सांगतात.  अनेक प्राण्यांपैकी एक म्हणजे कासव.  कासवाला कसला आधार आहे?  बर्ट्रांड रसेल याने दिलेलं सुजाण उत्तर म्हणजे कासवावर कासव अगदी शेवटपर्यंत कासवं. 

शेवट पर्यंत उकल नसलेले विरोधंभासात्मक अनेक प्रश्न असतात.  त्यातील एक प्रश्न म्हणजे आधी कोंबडी का आधी अंडं?  यासारखांच दुसरा प्रश्न म्हणजे कशास काय कारणीभूत ठरतं. जर एखाद्या ठिकाणी धूर असेल, तर तिथे आग लागलेली असते. जर तिथे आग लागली असेल, तर कोणीतरी ती लावली असेल. जर कोणीतरी ती लावली असेल, तर तिथे कोणीतरी आहे. जर तिथे कोणीतरी आहे, तर तिथे कोणीतरी अन्न शिजवत असेल. अशा प्रकारची ही कारणांची मालिका ही कधीच संपत नाही. 

पृथ्वीला आधाराची गरज आहे असे  समजले जात होते. भूकंपादरम्यान पृथ्वीची जोरदार हालचाल होत असल्याने हा आधार सजीव असणे आवश्यक आहे. काहींनी बैलाच्या रूपात तर काहींनी साप, राक्षस, मासा या रूपात या सजीवाची कल्पना केली. अशाच कल्पनेतलं एक म्हणजे कासव. पण कोंबडी आणि अंड या प्रश्नाप्रमाणेच आधाराचा प्रश्न संपत नाही. कासवाला कशा प्रकारे आधार मिळाला असेल? तर त्याच उत्तर म्हणजे दुसऱ्या कासवामुळे. टर्टल्स ऑल द वे (शेवटपर्यंत कासवँ) या सुजाण उत्तरातून आधाराची अव्याहतता अपेक्षिणे चुकीचे आहे हे कळते. . बर्ट्रांड रसेल याने या वाक्प्रचाराचा उल्लेख त्याच्या ‘व्हाय आय ॲम नॉट ख्रिश्चन’ (मी ख्रिस्ती का नाही ) या पुस्तकात केला आहे.

काही समुद्रातील कासवांच्या जाती समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूत त्यांची अंडी उबवतात. कधीकधी असं होतं की सगळ्या कासवांची पिल्लं एकाच वेळी अंडी फोडून बाहेर येतात आणि अशी हजारो कासवांची पिल्लं समुद्राशी पोहोचतात. ही घटना सुद्धा या चित्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

आजकाल समुद्रातील या कासवांना संरक्षण दिलं गेलं आहे. पण शिकारी येऊन अशा अनेक कासवांच्या पिल्लांना  पकडून नेत असल्याची वस्तुस्थिती काही फार जुनी नव्हे. याच्या सोबतीस असलेले चित्र अशी परिस्थिती चित्रित करत आहे की शिकारी या शिकार केलेल्या कासवांना भाजत आहे आणि त्यानंतरच्या मेजवानीसकटंच या जगाचा अंत होत आहे.    (या चित्राचे छायाचित्र येथे नाही)

 

धीमा आणि अविचल

मालिकेतील दुसरं सोबत करणारं चित्र म्हणजे स्लो अँड स्टेडी ( धीमा आणि अविचल). टेकडी चढणाऱ्या कासवासारखी जगाने केलेली प्रगती ही धीमी असली तरी अविचल आहे.

गारुडी

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

अंतरिक्षातील सापांनी पृथ्वी आणि इतर ग्रहांना त्यांच्या मस्तकावर धारण केले आहे. अंतरिक्षातील ग्रहांच्या हालचालीसाठी गारुडी या सर्पांना हालचाल करण्यास उद्दयुक्त करत आहे. 

पृथ्वीला असलेल्या आधारात सापाची क्वचितंच गणना होते. शेष या वैश्विक सर्पामुळे पृथ्वीची निर्मिती झाली असं महाभारताच्या अरण्यपर्वातील एका आख्यायिकेत म्हटलं आहे. बैल, कासव, हत्ती यांच्यासारख्या भक्कम आधारांऐवजी सापासारखा लवचिक आणि अरुंद असा आधार पृथ्वीस वारंवार हलवित असल्याची कल्पना केली जाऊ शकते. साप जमिनीच्या खाली राहतात या वस्तुस्थितीतून  कदाचित पृथ्वी धारण करणाऱ्या सापांची आख्यायिका आली असावी. आणि पृथ्वीस आधार देणारा तो कोणतातरी जमिनीखाली राहणारा प्राणी असावा. 

हे चित्र एक दंतकथा नसून एक कल्पना आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर सर्व ग्रहांना धारण करण्यात  सापांची लवचिकता महत्वाची ठरते. या विश्वातील सर्वच गोष्टी जागच्या जागी राहाव्यात यासाठी बहुधा गारुडी सापांना उत्तेजित करत आहे. 

या चित्राच्या युगांत सोबतीला ‘डिस्टर्बन्स ऑफ स्नेक्स’ ( सापांची हालचाल) अाहे.  सापांच्या चंचल वृत्तीवर चित्राचा भर आहे. 

ॲटलासचं ओझं

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

आख्यायिकेनुसार स्वर्ग आणि पृथ्वी यांना एकत्र धरून ठेवण्याचं ओझं ॲटलासवर लादलं गेलं होतं. बहुतांश संस्कृती सात स्वर्ग आणि सात नरक यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. भारतीय दंतकथांमध्ये पाताळ हा सातवा नरक होय.  

अंतरिक्षातील गोल धरून ठेवण्याची शिक्षा ॲटलासला फर्मावली गेली होती. या अंतरिक्षातील गोलात किंवा भारतीय पुराणकथांमध्ये संबोधिलेल्या ब्रह्माण्डात विश्वातील सर्वच गोष्टींचा समावेश होतो. यात सात विवरं/नरक आणि सात स्वर्ग अंतर्भूत होतात. 

अतल, वितल, सुतल,तलातल, महातल, रसातळ आणि पाताळ अशी या सात पाताळांची नावे. भूलोक(पृथ्वी), भुवरलोक, स्वरलोक, महर्लोक, जनर्लोक, तपोलोक आणि सत्यलोक अशी सात स्वर्गाची नावे.  ज्यू आणि मुस्लिम धर्मांमध्येही सात स्वर्गाची ही संकल्पना मांडली गेली आहे.

अनेक संस्कृतींमध्ये ग्रहांना सजीवाचे अस्तित्व दिले गेले आहे. खगोलीय अवकाशातील त्यांची असलेली अनियमित हालचाल हे त्यामागचे कारण असू शकते. 

या सर्व कल्पना या चित्रास प्रेरणादायी ठरल्या आहेत. 

या चित्रास सोबत करणारी परिस्थिती म्हणजे ॲटलासला हा अंतरिक्षातील गोल धरून ठेवण्यात आलेलं असामर्थ्य. परिणामी होणारा युगांत या चित्रात रेखाटला आहे.

सपाट पृथ्वी

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

अभ्यासकांनी प्रवासातून केलेल्या खगोलशात्रीय निरीक्षणांतून पृथ्वी वक्राकार आहे हे सिद्ध झाले असले तरी अनेक जण पृथ्वी सपाट आहे असंच मानंत होते. सपाट पृथ्वीस उंच पर्वतांनी घेरले आहे असं सुद्धा अनेक आख्यायिका भाकीत करतात. 

सपाट पृथ्वी या संकल्पनेला आता त्या लोकप्रियतेचा आधारही उरला नाही. तरी अशा बाबीवर विश्वास ठेवणारे अल्पसंख्यांक अजूनही आहेत. विज्ञानावरील अविश्वास आणि धर्मग्रंथांवरील विश्वास हे या अल्पसंख्यांकांच्या या श्रद्धेचं कारण असू शकतं. चित्र सपाट पृथ्वी या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन रेखाटलं आहे. सपाट पृथ्वीचा आकार वर्तुळासारखा असावा आणि कोणत्याही सजीवास ओलांडण्यास अशक्य अशा उंच पर्वतांनी ही पृथ्वी घेरलेली असावी अशी या धर्मग्रंथांची अपेक्षा होती. जर पृथ्वी सपाट असेल तर विश्वाचा आकार घनासारखा आहे ही संकल्पना या चित्राची प्रेरणा ठरली आहे. अर्थातच सपाट पृथ्वीचे भाकीत करणाऱ्यांचे मात्र हे मत नव्हे.

 दैवी युगुल

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

चेतना आणि विश्व यांची जोडी अविभाज्य आहे. चेतनेशिवाय विश्वाची कल्पना करणंच व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे विश्वाशिवाय चेतनेचा अंदाज लावणं तेवढंच निष्फळ आहे. “दैवी युगुल ही विश्व आणि चेतना या दोन्ही बाबींचं मूळ आहे” असं काव्यात्मकरित्या सांगणारी  दंतकथा म्हणजे दैवी युगुल. 

ऋग्वेदातील नासदीय सूक्तात  वास्तव विश्वाच्या व्युत्पत्तीच्या प्रश्नावर काही  ऋचा आहेत.   जीवनाची वा चेतनेची सुरुवात कशी झाली?  या प्रश्नाचा शोध आदिम काळापासून माणूस घेत आहे. यामुळेच कदाचित जगभरात याच प्रश्नावर अनेक दंतकथा आकारास येऊ लागल्या. जीवनरहित वास्तवापासून चेतनात्मक जीवन कसे अाले हे धुंडाळणाऱ्या सर्व दंतकथांना कायमंच एका किंवा अनेक जोड्यांची गरज भासते. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम तत्त्वज्ञानाने ॲडम आणि इव्ह या जोडीस उगम मानले. मेसोपोटेमिया येथील दंतकथांचा सुद्धा अशाच प्रकारच्या पहिल्या जोडीवर भर आहे. काही वेळेस ही पहिली जोडी दैवी असते. 

हिंदू दंतकथांमध्ये, मुख्यत्वे सांख्य संप्रदायात पुरुष आणि प्रकृती या वैश्विक जोडीशी उगम जोडला जातो. या वैश्विक जोडीच्या मिलनातून अखंड विश्व आणि जीवनाचा उदय झाला असे मानले जाते. भगवतगीता आणि हिंदू धर्माच्या अनेक मुख्य ग्रंथांमध्येसुद्धा पुरुष आणि प्रकृती या जोडीचा उल्लेख आहे. याचप्रमाणे या विश्वाची स्थापना करण्यात शिवशक्ती यादेखील वैश्विक जोडीचा हातभार लावला गेला आहे असे मानले जाते.

“पुरुष म्हणूनच आत्मा असून प्रकृती एक भौतिक बाब आहे. पुरुष एक सत्व आहे आणि त्या सत्वास मन, शरीर आणि विश्वाने लपेटून घेणारी ती प्रकृती आहे,” असे देवदत्त पटनाईक म्हणतात. 

प्राचीन खगोलशास्त्रात सुद्धा जोडीची ही संकल्पना आहे. राशीचक्रातील मिथुन ही रास एक अशीच.   डीएनए रेणूतील २ रेषा ही सुद्धा एक जोडीच आहे. 

अशा सर्व आख्यायिकेपासून या चित्राने प्रेरणा घेतली आहे. 

या चित्राला सोबत करणारं युगांत हे भांडणाचं प्रतीक आहे. जर एखादी जोडी हा जीवनाचा उगम असेल तर वादांमुळे ही जोडी तुटणं याच जीवनाचा अंत करू शकतं . चित्राची प्रेरणा यात आहे.

अजून एका चित्राचे रेखाटन असे आहे.  (हे चित्र या प्रदर्शनाचा भाग नाही).

 

मेरू- मंदार

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

मेरू एवढ्या अजून एका भव्य पर्वताचे अस्तित्वाचे भाकीत आख्यायिकेतून होते.  क्षीरसागरात हा  पर्वत उभा आहे आणि समुद्रमंथनासाठी त्याचा रवीसारखा वापर केला गेला होता. खगोलीय दुधाच्या समुद्रातून मंथनातून चंद्र उपजला अशी दंतकथा अाहे. 

मंदार पर्वत हा मेरु पर्वतांपेक्षा जास्त गूढ आहे.. मेरूचा अर्थ ॲक्सिक्स या त्याच्या इंग्रजी प्रतिशब्दांच्या अगदी नजीकचा आहे. मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा.  मंदार या शब्दाचा अर्थ म्हणजे एक स्वर्गीय वृक्ष. 

समुद्रमंथन या आख्यायिकेत मंदार पर्वताचा उल्लेख आहे. यात दुधाच्या समुद्रात मंथनासाठी मंदार पर्वताचा वापर केला होता. तसेच आकारमानात मेरुपर्वाच्या  तोडीस तोड ठरणारा हा पर्वत आहे. त्यामुळे हा पर्वत ऐहिक नसून विश्वात खगोलीय दुग्ध समुद्राच्या जवळ असणारा एक असावा असा आख्यायिकेचा अर्थ होऊ शकतो.

चित्र हे दोन्ही पर्वत आणि खगोलीय दुग्ध समुद्र दर्शवते.

मेरू: एक अक्ष

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

 

मेरू, सुमेरू आणि महामेरू विश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. सर्व खगोलीय ग्रहतारे या पर्वताभोवती परिभ्रमण करीत असतात. 

साधारणतः ग्रीक काळादरम्यान आणि त्यानंतर  विश्वाच्या स्वरूपाचा एक सिद्धांत प्रचलित होऊ लागला होता. अनेक संस्कृतींमध्ये हा सिद्धांत मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला होता. एका पृथ्वीच्या आसाभोवती फिरणारा विश्वगोल आणि ज्यावर ग्रह फिरू शकतील असे अातले स्फटीकीय  गोल हे या सिद्धांताचे मूख्य रूप होते.

भारतीयांकडे या सिद्धांताची स्वत:ची आवृत्ती होती.  त्यांच्या सिद्धांतात ग्रहांसाठी अदृश्य स्फटीकीय गोल नव्हते. खगोलीय गोलाला ब्रह्माण्ड असे संबोधले जाई।  ज्याला बहुधा एक भौतिक अक्ष होता.  या अक्षाबाबतचे लिखाण भारतातील तीनही धर्मांच्या साहित्यातून मिळतो.  तीन्ही धर्मांच्या अनेक ग्रंथांमध्ये मेरू पर्वताची संकल्पना आढळते.  त्या काळात आकलनात असलेल्या ब्रह्माण्डाच्या त्रिज्येइतकी या पर्वताची उंची दिलेली अाहे.  बुद्ध आणि जैन धर्मांचे अनुयायी हा पर्वत पृथ्वीखाली दक्षिण दिशेस असल्याचे मानत असत. संपूर्ण अंतरिक्ष मेरू पर्वताची प्रदक्षिणा करत असल्याचंही यांचं अनुमान होते.

कदाचित पूर्वेतिहासिक काळात माणसाने ताऱ्यांची  गणना  सुरु केली असावी.  तेव्हा ताऱ्यांच्या समूहाला ओळखीच्या प्रतिमांची नावे दिली असावी.  हळूहळू खगोलीय विषुववृत्तावरील ताऱ्यांच्या समूहांची पुनर्विभागणी केली गेली.  समकोन असलेल्या अशा १२ समूहांमध्ये त्यांना विभागले  गेले आणि त्यांना राशी असे संबोधले गेले.  यातलं प्रत्येक राशी सौर दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याचं प्रतिनिधित्व करत होती. भारतीय दिनदर्शिका प्रणाली मात्र  वेगळ्या प्रकाराने विकसित होत होती. त्यांचं लक्ष चंद्राच्या स्थानावर केंद्रित असल्याने सौर वर्षाच्या या दुरुस्त्यांना गृहीत धरून त्यांनी चंद्र दिनदर्शिका बनवली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी गृहीत धरलेले ताऱ्यांचे समूह वेगळे झाले. त्यांना नक्षत्र असे म्हटले गेले. एक दिवसात होणाऱ्या चंद्राच्या प्रवासाशी प्रत्येक नक्षत्र असा तो संबंध लावला.  काव्यात्मकरित्या नक्षत्रे स्त्रीरूपी  आणि चंद्र हा पतीरूपी कल्पिला गेला.  जो त्यातल्या प्रत्येकीसोबत एक दिवस वास्तव्य करत असे अशी कल्पना केली गेली.

मेरू द ॲक्सिक्स  हे चित्र मेरू आणि या नक्षत्रांच्या अशा कथांवर आधारित आहे.  त्यासोबत असलेले युगांत हे चित्र खंडित अक्षाची शक्यता दाखवते.

युगांत: खंडित अक्ष

Cosmos Collection

सूर्याचा स्फोट होऊन तो पृथ्वीला गिळंकृत करण्याइतका विस्तृत होईल . आपलं हे युग लोप पावेल. जेव्हा जगाचा अक्ष भंग पावेल तेव्हाही युगांत होईल. 

एका  भारतीय आख्यायिकेनुसार मेरू पृथ्वीच्या उत्तरेस आणि दक्षिणेस, दोन्ही दिशांना होता.  मेरू पर्वताचा वरच्या भागात असलेला अंश  खंडित होऊन पृथ्वीवर कोसळला आणि त्यातून लंकेची निर्मिती झाली. 

त्याचप्रमाणे खालच्या भागात असलेला अंशसुद्धा भंग पावू शकतो अशी या चित्राची कल्पना आहे.  यामुळे विश्वाचा अंत होईल. चित्रात हीच बाब साकारली असून इतर प्रतिक्रियाही रेखाटल्या आहेत. 

युगांत नावाच्या मालिकेची ही चित्रं मुख्य चित्राची सोबत करतात. मुख्य चित्रात असलेल्या संकल्पनेच्या अनुषंगाने कल्पिलेली ही  चित्रे आहेत. एका युगाचा अंत हा युगांत या शब्दाचा नेमका अन्वयार्थ होय. या मालिकेत युगांत म्हणजे विश्वाचा अंत.   

विश्व एक अवलोकन

जहांगीर अार्ट गॅलरीत १८ ते २४ फेब्रु. दरम्यान होणाऱ्या माझ्या चित्रप्रदर्शनाचे नाव ‘विश्व एक अवलोकन’ असे आहे.

खाली दिलेली यादी ही या प्रदर्शनातील चित्रसमुहांची अाहे.  प्रत्येक पानावर त्यासंबधी लिहिलेले आढळेल जे वाचल्यास चित्र समजण्यास मदत होईल.   या पानांवर बहुतांशाने रंगीत चित्रांची कृष्णधवल छायाचित्रे अाहेत.   हे मुद्दाम केले आहे जेणेकरून तुमचा चित्रपदर्शनास भेट देण्यात तुमचा रस कायम राहील.

१. क्रॉस स्टाफ

२.मेरू: एक अक्ष

 मेरू- मंदार

४. दैवी युगुल

५.सपाट पृथ्वी

६.ॲटलासचं ओझं

७. गारुडी

८. शेवटपर्यंत कासवं

९. सप्तसागर

१०.नचिकेताचं काळचक्र

११.अनाक्सिमॅण्डरचं घड्याळ

१२. आभासी जग

१३. महास्फोट

१४.हबलचा फुगा

१५.क्वांटमची  अनेक जगं

१६.जगाच्या आत जग

१७.टोलेमीचं जग

क्रॉस स्टाफ

विश्व एक अवलोकन क्रमवारी                                                 पुढील चित्र

विश्व कसे आहे?  हे कोडे आणि  इथून तिथे कसे जायचे? ही समस्या सोडवण्यासाठी माणूस सतत संघर्ष करत राहिला.  एकमेकांशी संबंधित असलेली दोन्ही कोडी सोडवणं शक्य झालं एका साध्या   क्रॉस स्टाफ नावाच्या वापरण्यास सुलभ अशा यांत्रिक उपकरणामुळे.

अनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून माणूस विश्वाचं स्वरूप धुंडाळण्यासाठी झगडत आहे. विद्वानांनी ग्रहांच्या हालचालीमागचे तर्कशास्त्र शोधण्याचे प्रयत्न केले. याच शोधाचा पाठलाग करता करता ताऱ्यांची गणना सुरु झाली. ताऱ्यांच्या आकारांना नावे दिली गेली. गोलाकार त्रिकोणमिती या गणिताच्या नवीन शाखेचा शोध लागला. मोठ्या प्रमाणात गणना चालू झाल्या. साइन, कोसाइन यांचे तक्ते मुखोद्गत केले जाऊ लागले. नोंदींचा उलगडा होण्यासाठी अनेक शतके त्यांचे जतन केले गेले. या सर्व प्रयत्नांतून विज्ञानाच्या नवीन पर्वास सुरुवात झाली. यातूनच विश्वातील अनेक कोडी सोडवली जात होती.

बुद्धिमान प्रवाशांच्या प्रयत्नांची इथे दाखल घेणं आवश्यक आहे. त्यांच्या नोंदींतून पृथ्वी गोल आहे या बाबीस वस्तुस्थिती मानले जाऊ लागले. पृथ्वीच्या चंद्रापासून असलेल्या अंतराचा साधारण अंदाज बांधला जाऊ लागला. अत्यंत महत्वाचे असे हे दोन शोध लागून २००० वर्षे उलटली. खगोलशास्त्राचा माणसाने केलेला उपयोग ही एक अभूतपूर्व घटना आहे. समुद्रातील दुर्गम बेटांपर्यंत पोहोचण्यासाठी आदिवासींनी खगोलशास्त्रीय प्रवासदर्शनाचा वापर केला असे मानले जाते. वास्को द गामा जेव्हा पोर्तुगालवरून भारतात आला तेव्हा त्याने ॲस्ट्रोलेब अशा नावाचे प्रवासदर्शनाचे उपकरण वापरले. हे उपकरण म्हणजे असा पहिला यांत्रिक संगणक होता ज्याने आकडेमोड कमी केली. मध्ययुगात ॲस्ट्रोलेब खूप लोकप्रिय झाला होता. वास्को द गामा जेव्हा भारतात आला तेव्हा त्यास ॲस्ट्रोलेबची भारतीय आवृत्तीसुद्धा आढळली होती.

दूरदर्शक दुर्बीण आणि इतर अचूकतेचा वेध घेणाऱ्या उपकरणांच्या शोधानंतर माणसाने या क्षेत्रात मोलाची प्रगती केली. खोल समुद्रातून सुरक्षित जागेस पोहचण्यासाठी यापूर्वी माणूस सर्वसामान्य उपकरणांचा वापर करीत असे. या उपकरणांचा वापर करून तसेच पंचांग आणि गणिताच्या तक्त्यांच्या साहाय्याने जगाच्या नकाशावर, खलाशी, जहाजांची स्थिती निश्चित करीत असंत.

अर्वाचीन काळात गोल, भग्ना, चक्र, घटी, शंकू, शाक्त, कारतार्य:, पिप्त, कपाळ, शलाका अशासारखी काही उपकरणे भारतीय वापरत होते. जरी ही उपकरणे वरून साधी वाटत असली तरी बहुधा याच काळात त्याची अचूक संरचना ही त्याची विशेषता होती. 

क्रॉस स्टाफ नावाच्या कोन मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या अशाच हाताळण्यास सुलभ अशा उपकरणाने माझे लक्ष वेधून घेतले. हे चित्र माणसाच्या या संघर्षाला दिलेली मानवंदना आहे. क्रॉस स्टाफ आणि एकचक्षू समुद्री चाचे यांची मी चित्रासाठी निवड केली आहे.  काही सिद्धांतआणि दंतकथा यांच्यात अंतर्भूत असलेल्या  नव्या युगारंभ  या चित्रातून रेखाटलेला आहे. 

चाचा म्हणजे एकचक्षू असलेला, असे रेखाटन आपल्या मनात झाले अाहे.  सूर्याचा कोन मापण्यासाठी,  तज्ञ खलाशास एक डोळा झाकावा लागणे साहजिक आहे. त्यासाठी डोळ्यावरच्या पट्टीचा वापर साहजिक पणे करावा लागतो. त्यातून कदाचित हे प्रतीकात्मक रेखाटन निर्माण झाले असावे. माझ्यासाठी जहाजास सुरक्षित आश्रयस्थानी पोहोचवणाऱ्या जाणकाराचा तो एक प्रतिनिधी आहे.  

Vista e Celestia

Vista e Celestia is the name of the exhibition at Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Fort Mumbai from 18th Feb 2019 to 24th Feb 2019
Following is the list of group of paintings in the show.  In each page there will be a write-up which will assist you to understand the paintings better.  Most of the photographs here are in black and white of coloured paintings.   This is specifically to keep your interests in visiting the show and see the actual paintings.

 

 

1 Cross Staff
2. Meru-the axis of cosmos
3. Meru Mandar
4. Divine Pair
5. Flat Earth
6. Atlas’s Burden
7. Snake Charmer
8. Turtles All the Way
9. Seven Seas
10. Nachikeata’s Time Wheel
11. Anaximander’s Clock
12. Virtual World
13. Big Bang
14. Hubble’s Bubble
15. Multiple Worlds of Quantum
16. World Within World
17. Ptolemy’s World